Home Breaking News अमरावतीत महायुतीचा विजयी संकल्प मेळावा; किरणराव सरनाईक यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे...

अमरावतीत महायुतीचा विजयी संकल्प मेळावा; किरणराव सरनाईक यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती; प्रचाराला गती देण्याचा निर्धार

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किरणराव सरनाईक यांच्या निवडणूक प्रचारासाठी अमरावती येथे महायुतीच्या घटक पक्षांचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात महायुतीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करावे, प्रचार यंत्रणा अधिक प्रभावी करावी आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून किरणराव सरनाईक यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवून महायुतीच्या विजयासाठी ताकदीने काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

 

महायुतीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

 

या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, खासदार डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, अकोल्याच्या महापौर शारदाताई खेडकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

 

यावेळी आमदार प्रवीण तायडे, राजेश वानखडे, प्रताप अडसड, केवलराम काळे, उमेश यावलकर, राजू तोडसाम, बच्चू कडू, रणधीर सावरकर, रवी राणा, संजय खोडके, सुलभाताई खोडके, सईताई डहाके, किसनराव वानखडे आणि श्याम खोडे यांनीही उपस्थिती दर्शविली.

 

तसेच अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय राखून प्रचाराची धुरा सांभाळणे आणि शिक्षक मतदारांचा विश्वास संपादन करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश ठरला. आता प्रत्यक्ष प्रचारात महायुतीचे कार्यकर्ते किती प्रभावीपणे एकत्रित काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!