Home Breaking News झुल्लर येथे श्रीजी ब्लॉक कंपनी मध्ये स्फ़ोट, एक ठार 6 गंभीर जखमी

झुल्लर येथे श्रीजी ब्लॉक कंपनी मध्ये स्फ़ोट, एक ठार 6 गंभीर जखमी

झुल्लर येथे श्रीजी ब्लॉक कंपनी मध्ये स्फ़ोट, एक ठार 6 गंभीर जखमी

मौदा: तालुक्यातील झुल्लर येथील श्रीजीं ब्लॉक कंपनीमध्ये आज पहाटे जवळपास 3:30 च्या दरम्यान झालेल्या भयंकर बॉयलर ब्लास्टने  नंदकिशोर करंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये राजेंद्र किसनजी उमप(झुल्लर), हुसेन  बाशीर सय्यद(वदोडा), स्वप्नील  नारायण सोनकर(वदोडा), कल्लू उमेदा शाहू(वदोडा),  कुवरलाल गुणाजी भगत(वदोडा), वंश विष्णुजी वानखेडे(झुल्लर), गुणवंत दौलतराव गजभिये(वदोडा), रामकृष्ण मनोहर विभुते(वदोडा), ब्रह्मानंद रामाजी मानेगुडधे(राणमांगली) हे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सोबतच या भयंकर घटनेत तीन बकऱ्या देखील मृत झाल्या आणि आजूबाजूच्या शेतातील सहा घरांचे मोठे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेने मृतकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेची माहिती मिळताच प्रा. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद नागपूर यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली. कंपनीच्या माध्यमातून मृतकाच्या कुटुंबीयांसाठी ३० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.

 

Don`t copy text!