Home Breaking News मित्राला वर खेचण्याचा नादात तरुण बुडाला ; मकरधोकडा जलाशयातील घटना

मित्राला वर खेचण्याचा नादात तरुण बुडाला ; मकरधोकडा जलाशयातील घटना

मित्राला वर खेचण्याचा नादात तरुण बुडाला ; मकरधोकडा जलाशयातील घटना

उमरेड :- तालुक्यातील अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेल्या मकरधोकडा जलाशयात स्वातंत्र्यदिनी पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या युवकाचा मित्राला वर खेचण्याचा नादात पाण्यात पडून वेळीच मदत न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्राप्त महिनुसार डिप्टी सिग्नल, कळमना, नागपूर येथील तरुण पाण्यात बुडल्याची माहिती आहे. स्वातंत्र्य दिनावर सुट्टी असल्याने जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांवर गुरुवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली त्यातच पावसाळ्यात प्रेक्षकांना खुनावणाऱ्या व अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेल्या मकरधोकडा जलाशयावरही पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. प्राप्त विडिओ नुसार 3 युवक एकमेकांच्या मदतीने जलाशयाच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्नात असताना एक युवक भिंती वर चढला तर दोघे चढत असताना उभ्या तरुणाचा हाथ सुटल्याने 2 युवक जलाशयाच्या भिंतीच्या खाली पडले तर 1 तरुण जलाशयात पडला.त्यातच जलाशयात पडलेल्या तरुणाला वेळेवर त्याला मदत न मिळाल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास उमरेड पोलीस करीत आहेत.

 

Don`t copy text!