Home Breaking News वीज कोसळून महिलेचा मृत्यू

वीज कोसळून महिलेचा मृत्यू

वीज कोसळून महिलेचा मृत्यू

कुही :- तालुक्यात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कुही भागात विजांच्या गडगडाट सह पावसाला सुरुवात झाली. यातच ५.३० च्या सुमारास शेतात असलेल्या महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.
सुमन देवराव हटवार (वय-५५) रा.कुही असे मृत महिलेचे नाव आहे. कुही ते पांडेगाव मार्गावर गावापासून अवघ्या ५०० मिटर अंतरावर हटवार यांचे शेत असून नियमितपणे त्या शेतात गेल्या होत्या.दरम्यान ५.३० च्या सुमारास अचानक विजांच्या गडगडाट सह पाऊस सुरु झाला. यातच सुमन हटवार यांच्यावर वीज कोसळली त्यांना कुही येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले,

Don`t copy text!