श्रीकांत पाचकवडे
अकोला, : akola news- शिवसेनेच्या (शिंदे गट ) अकोला जिल्हा विशेष प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर ललित वानखडे यांनी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी राजराजेश्वर संस्थानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व श्री राजराजेश्वरांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
नियुक्तीनंतर राजराजेश्वरांचे घेतले दर्शन
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ललित वानखडे यांची अकोला जिल्हा विशेष प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर वानखडे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, डॉ. अशोक ओळंबे, संतोष अनासने, तरुण बगैरे, योगेश ढोरे, अनिल मालगे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहणार
सत्काराला उत्तर देताना ललित वानखडे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर माहिती अनिल मालगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.






