Home Breaking News मांढळ येथे शिवजयंती निमित्त ह.भ.प. कांचनताई शेळके यांच्या कीर्तनाचे आयोजन

मांढळ येथे शिवजयंती निमित्त ह.भ.प. कांचनताई शेळके यांच्या कीर्तनाचे आयोजन

मांढळ येथे शिवजयंती निमित्त ह.भ.प. कांचनताई शेळके यांच्या कीर्तनाचे आयोजन

कुही : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून मांढळ ग्रामस्थ आणि शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. कांचनताई शेळके यांचा कीर्तन सोहळा रंगणार आहे.

​हा सोहळा तिथीप्रमाणे साजरा केला जाणार असून, शुक्रवार, दिनांक ६ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात सायंकाळी ६:०० वाजता हरिपाठ, सायंकाळी ७:०० वाजता ह.भ.प. कांचनताई शेळके यांच्या मधुर वाणीतून कीर्तन सोहळा बुद्धे ले-आउट मधील भव्य प्रांगणात सादर होईल.

कीर्तनकारांचा परिचय

​या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या ह.भ.प. कांचनताई शेळके या ‘झी मराठी’ फेम असून, त्या महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि तरुण भागवताचार्य म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिक उत्सुक आहेत.

​​या भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती व समस्त मांढळ ग्रामवासी यांच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि हा भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी मांढळ व परिसरातील सर्व शिवप्रेमींनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!