Home विदर्भ अकोला तालुक्यात महसूल प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत...

अकोला तालुक्यात महसूल प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’

‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’
तहसीलदार कुणाल झाल्टे : नागरिकांच्या सेवेसाठी महसूल यंत्रणा सज्ज
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राज्यभर ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जलद, सुलभ आणि तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती अकोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली. अकोला तालुक्यात महसूल प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या, प्रश्नांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी महसूल यंत्रणा सज्ज झाला ची माहिती तहसीलदार कुणाल झालटे यांनी दिली.
अकोला तहसील कार्यालयातील महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची अभियानांतर्गत सुनावणी घेण्यात येणार असून, तडजोडीस पात्र प्रकरणांचा दोन्ही पक्षकारांच्या संमतीने कायद्यानुसार अंतिम निपटारा करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि वारंवार कार्यालयीन पाठपुरावा करण्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
मा. जिल्हाधिकारी, अकोला यांच्या निर्देशानुसार तहसीलदार, अकोला यांनी अभियानांतर्गत प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करण्यासह संबंधित पक्षकारांना सुनावणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित पक्षकारांनी सुनावणीच्या वेळी स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला तहसील कार्यालयात महसूल लोक अदालत दि. १४ ऑक्टोबर २०२६ आणि दि. १६ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
अकोला तालुक्यातील महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील संबंधित पक्षकारांनी या अभियानाचा लाभ घेऊन तडजोडीस पात्र प्रकरणे परस्पर संमतीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अकोल्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.
Don`t copy text!