Home विदर्भ अकोला तालुक्यात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा- तहसीलदार कुणाल झाल्टे

अकोला तालुक्यात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा- तहसीलदार कुणाल झाल्टे

महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना सहभागाचे आवाहन

 

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १७ ऑगस्ट २०२६च्या शासन निर्णयानुसार गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा तालुका व जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेसाठी अकोला तालुकास्तरीय निवड समिती गठित करण्यात आली असून, तालुक्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

मंडळांची प्रत्यक्ष स्थळी पाहणी

तालुकास्तरीय निवड समिती गणेशोत्सव काळात मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण करणार आहे. या परीक्षणानंतर अकोला तालुक्यातील एका विजेत्या मंडळाची निवड करण्यात येईल. विजेत्या मंडळाची जिल्हास्तरीय परीक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली जाणार आहे.

 

नोंदणीकृत मंडळांनाच सहभाग

स्पर्धेत संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. पात्र मंडळांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 

अर्जासाठी ganeshostav.pldmka.co.in या पोर्टलवर उपलब्ध अर्जाद्वारे नोंदणी करावी.

 

अकोला तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या उत्सवाचे वैशिष्ट्य राज्यस्तरावर पोहोचवावे, असे आवाहन तालुकास्तरीय निवड समितीने केले आहे.

Don`t copy text!