एकलव्य बचाव पथक, अकोट ग्रामीण पोलीस व संबंधित विभागांचा सहभाग; स्वच्छतेला सुरुवात…!
कुशल भगत
अकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरण परिसरातील गणेश घाटावर गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विसर्जन घाटाची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान एकलव्य बचाव पथक, पोपटखेडचे अध्यक्ष पांडुरंग तायडे, अकोट ग्रामीण पोलीस तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने घाट परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे गणेश विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे






