श्रीकांत पाचकवडे
अकोला Akola News : सिव्हिल लाईन पोलिसांनी अकोला बसस्थानकावर झालेल्या पाकीट चोरीचा तपास लावत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या रकमेतून ३८ हजार ५०० रुपये रोख हस्तगत करण्यात आली.
११ सप्टेंबर रोजी आत्माराम ज्ञानेश्वर ब्राह्मण (४९, रा. सुधीर कॉलनी, रेवी नगर, अकोला) हे बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील सुमारे ५० हजार रुपये असलेले पाकीट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा क्र. ६१७/२०२६, कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
गुप्त माहिती, तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचले
पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी तपास पथकाला सूचना दिल्या.
पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. या तपासातून शेख वकील शेख हाफिज (२५, रा. रऊफनगर, सोहेल टॉवर प्लॉट, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
घरझडतीत रोकड हस्तगत
आरोपीची अंगझडती आणि घरझडती घेतल्यानंतर चोरीच्या रकमेतून ३८,५०० रुपये रोख पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हील लाईन पोलीस करीत आहेत.

पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ प्रदीप रिसासट, प्रदीप पवार, यादव तसेच इतर अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.






