Home सामाजिक Akola News : उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने डॉ. सुचिता गुप्ता यांचा गौरव

Akola News : उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने डॉ. सुचिता गुप्ता यांचा गौरव

श्रीकांत पाचकवडे

अकोला Akola News : कृषी संरचना आणि कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. सुचिता गुप्ता यांना प्रतिष्ठित उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Akola News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषी संरचना विभागाच्या प्रमुख म्हणून डॉ. गुप्ता कार्यरत आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या (Joint Agresco) बैठकीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

कृषी अभियांत्रिकीतील योगदानाची दखल

कृषी संरचना, कृषी अभियांत्रिकी तसेच कृषी संशोधन व विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. गुप्ता यांचा गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

 

पुरस्कार सोहळ्यास सचिव परिमल सिंह, मंत्री आशिष जैस्वाल, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (MCAER) महासंचालक माहिवाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा

डॉ. सुचिता गुप्ता यांना मिळालेला हा पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे कृषी तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि शेतकरीकेंद्री संशोधनाला नवी दिशा मिळण्यास मदत होत आहे.

 

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे तसेच विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व सहकाऱ्यांनी डॉ. गुप्ता यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

Don`t copy text!