Home सामाजिक खामगावच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; सुरजभैय्या यादव यांना ‘फाउंडर मेंबर’ व ‘महाराष्ट्र...

खामगावच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; सुरजभैय्या यादव यांना ‘फाउंडर मेंबर’ व ‘महाराष्ट्र रक्तवीर’ सन्मान

खामगाव, दि. १४ सप्टेंबर २०२६ : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्य करणाऱ्या खामगावचे सामाजिक कार्यकर्ते सुरजभैय्या यादव यांचा राष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची तसेच रक्तदान क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना ‘संस्थापक फाउंडर मेंबर’ आणि ‘महाराष्ट्र रक्तवीर’ या दोन महत्त्वपूर्ण सन्मानांनी गौरविण्यात आले.

खामगाव (OTT News Network ):खामगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकत चालली असून अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

दरभंगा येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन

 

सोशल ॲक्टिव्हिस्ट वेल्फेअर असोसिएशन ऑफ भारत (SAWAB), नवी दिल्ली यांच्या वतीने बिहारमधील दरभंगा येथे ‘मिथिला मीट-२०२६ (फाउंडर मेंबर्स समिट)’ या राष्ट्रीय अधिवेशनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची या अधिवेशनाला उपस्थिती होती.

 

सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

 

या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातून सुरजभैय्या यादव, खामगाव, जि. बुलढाणा यांची संस्थेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून असलेली भूमिका आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली. त्यांना संस्थेचे ‘संस्थापक फाउंडर मेंबर’ म्हणून विशेष सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

 

रक्तदान कार्याबद्दल ‘महाराष्ट्र रक्तवीर’ सन्मान

 

रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुरजभैय्या यादव यांना ‘महाराष्ट्र रक्तवीर’ हा विशेष सन्मानही प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी जनजागृती आणि गरजू रुग्णांना मदत करण्याच्या त्यांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

 

मान्यवरांच्या हस्ते सन्मान

 

SAWAB चे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक कुमार महथा, ॲड. गोपालसिंह पुरवा आणि श्री. नरेश शर्मा यांच्या हस्ते सुरजभैय्या यादव यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाचा हा विशेष क्षण छायाचित्रातही कैद झाला.

 

महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

 

यावेळी अभयकुमार तेलतुंबडे, माधव सुवर्णकार, नंदकिशोर नळे, किशोर वासेकर, सरिता डाकरे, मंतोष मिश्रा, उज्वला पवार, सुरेश रेवणकर, मयुर काळे, योगेश घोडे यांच्यासह महाराष्ट्र टीममधील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

खामगाव-बुलढाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

सुरजभैय्या यादव यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अशी माहिती किशोर वासेकर यांनी दिली.

Don`t copy text!