Home Breaking News आवरमारा येथे भीषण आग ; आगीत 4 घरांचे नुकसान

आवरमारा येथे भीषण आग ; आगीत 4 घरांचे नुकसान

आवरमारा येथे भीषण आग 

आगीत 4 घरांचे नुकसान

कुही :- तालुक्यातील आवरमारा येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 4 घरांचे नुकसान झाले आहे. तर शेतीउपयोगी साहित्यासह दुचाकी जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

गुरुवारी दुपारी 2.३० च्या सुमारास तेथील निर्मला गणपत वंजारी यांच्या घरी अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास उन्हाचा ताप पाहता घराणे चांगलाच पेट घेतला. काही वेळातच नजीकच्या विष्णू बावनकुळे, रोशन वंजारी आणी सचिन माकडे यांच्या घरालाही आग लागली. गावकर्यांनी वेळीच प्रसंग सावध राखत आगीवर नियंत्रण राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर सायंकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात शेतीउपयोगी साहित्यासह, दुचाकी व दैनंदिन जीवन उपयोगी साहित्य जाळून खाक झाले. त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Don`t copy text!