Home Breaking News मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, गावात चर्चा,...

मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, गावात चर्चा, दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय

मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, नागपुरातील गावात चर्चा, दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय

नागपूर : पोटच्या २४ वर्षीय मुलाच्या मित्रासोबत ४८ वर्षीय आईने पलायन केले. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्याच मुलाच्या मित्रासोबत पलायन केल्याचा जबर धक्का ५५ वर्षीय दृष्टिहीन पतीला बसला. त्याने विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

काय घडलं नेमकं?

प्राप्त माहितीनुसार, ५५ वर्षीय इसमाला २४, २६ व २८ वर्षीय तीन मुले आहेत. मिळेल ते काम करून हा इसम पत्नीच्या मदतीने कुटुंबाचा गाडा हाकायला लागला. एकदा श्रम करताना दगड उसळला. तो डोक्याला लागल्याने त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. त्यामुळे काम जमत नव्हेत. तो घरीच राहायला लागला.

मुलाच्या मित्राशी अनैतिक संबंध

दरम्यान, दाम्पत्याच्या २४ वर्षीय मुलाचा मित्र घरी यायला लागला. आईचे मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधाची गावात चर्चा सुरू झाली. एके दिवशी संधी साधून ही ४८ वर्षीय महिला मुलाच्या मित्रासोबत पळून गेली. काही दिवस त्याच्यासोबत राहून गावी परतली. पतीने मोठ्या मनाने तिचा स्वीकार केला. काही दिवस दोघेही शांत राहिले. मात्र, त्यानंतर तो मुलगा व या महिलेचे प्रेम पुन्हा फुलले. ते सतत भेटायला लागले. त्यांची समजूत घालूनही काही फायदा झाला नाही.

दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय

आठ दिवसांपूर्वी मुलाच्या आईने मित्रासोबत पुन्हा पलायन केले. याबाबत पुन्हा गावात चर्चा सुरू झाली. दृष्टिहीन पतीने पत्नी घरी परत यावी, यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आले नाही. पत्नी घरी परत न आल्याने हताश होऊन पतीने विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने तातडीने उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. महिलेचा पती मृत्यूशी झुंज देत आहे

दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याची माहिती भिवापूर पोलिसांनी दिली. प्रकरणाचा तपास सुरू आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नव्हता. (बातमी स्त्रोत म.टा)

Don`t copy text!