Home विदर्भ राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याचा झेंडा उंच; १ सुवर्ण, २ कांस्यपदकांची दमदार कमाई

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याचा झेंडा उंच; १ सुवर्ण, २ कांस्यपदकांची दमदार कमाई

ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६
ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : किकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि अमेच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ ओडिशा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत अकोला जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत १ सुवर्ण व २ कांस्यपदके जिंकून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.
दि. ३० मे ते ३ जून २०२६ या कालावधीत के. टी. ग्लोबल स्कूल, खुर्दा (ओडिशा) येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या या स्पर्धेत अकोल्याच्या युवा खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर चमकदार कामगिरी केली.
सुवर्णपदकावर श्रेयाची मोहोर
-४८ किलो वजनगटात कु. श्रेया रवी सुरळकर हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले आणि राष्ट्रीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दोन कांस्यपदकांची भर
याशिवाय -६९ किलो वजनगटातील नयन सुरवाडे आणि -७५ किलो वजनगटातील नयन चिपडे यांनी उत्कृष्ट लढती देत कांस्यपदके जिंकली. तर -४५ किलो वजनगटातील आर्यन शिरसाट यानेही उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची छाप स्पर्धेत उमटवली.
प्रशिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाचे फळ
या यशामागे खेळाडूंची अथक मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे मानले जात आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार आणि सचिव धीरज वाघमारे यांनी अभिनंदन केले.
तसेच किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन अकोलाचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक अनंत पाचकवडे आणि सचिव संगीता सुरळकर यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले.
अकोल्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण
राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे अकोला जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत झाली आहे. युवा खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही अकोल्याचे नाव उज्ज्वल करण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे.
Don`t copy text!