खामगाव: रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान मानले जाते.आपल्या रक्ताच्या एका युनीटमुळे अनेक गरजु रुग्णांना नवजीवन मिळू शकते.रक्ताची गरज कोणालाही भासु शकते. त्यामुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि अधिका-धिक नागरीकांनी या जीवनदायी कार्यात सहभागी व्हावे या उदद्ेशाने दरवर्षी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले जात असतात.महाराणाजींच्या जयंतीदिनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करुन रक्तदानाच्या विधायक कार्यात सहभाग घेणारे युवक हे निश्चीतच अभिनंदनास पात्र आहे असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.बुधवार दि.17 जून 2026 रोजी तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल तृतीया दिनी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची 486 वी जयंती शक्तीउपासक,समाजभुषण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विधायक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.याप्रसंगी सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीमध्ये जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर पार पडले त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,सहकार मित्र राणा राजेंद्रसिंह सानंदा,राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,शेगाव पं.स.चे माजी सभापती विजय काटोले,खामगाव कृ.उ.बा.स.संचालक विलाससिंग इंगळे,किशोरसिंह राजपुत,दुर्गासिंग ठाकुर,शहर उपाध्यक्ष नरहरी टीकार,केशव कापले,पुरुषोत्तम शेजोळे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,काही लोकांच्या मनात रक्तदानाबदद्ल गैरसमज आहे.परंतू रक्तदानामुळे शरीर निरोगी राहण्यास सुध्दा मदत होते.म्हणून थोर महापुरुषांच्या जयंतीदिनी किंवा आपल्या वाढदिवशी प्रत्येकाने रक्तदानासारख्या विधायक कार्यक्रमाचे हिरहिरीने सहभाग घेवुन रक्तदान करावे,सध्या उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे राज्यातील रक्तपेढयामध्ये रक्ताचा तुटवडा आहे. अश्या वेळेस रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, राणाजींच्या जयंतीदिनी युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.ज्या-ज्या वेळेस रुग्णांना रक्ताची गरज भासेल त्या-त्या वेळेस सकल राजपुत समाजाचे युवक रक्तदानासाठी सदैव तत्पर राहतील असे त्यांनी सांगितले.
सामान्य रुग्णालय येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबीरामध्ये राणा दिग्वीजयसिंह दिलीपकुमार सानंदा,
रोहितसिंग तहसिलदारसिंग राजपुत,तानाजी चव्हाण,उमेश राठोड,विजयसिंग पल्हाड,सागर राजपुत, कल्याणसिंग तोमर,सुरेशसिंग वतपाळ,आकाश घोडके, चंद्रकांत पवार,नितेश पवार,जयसिंग प्रभाकर पवार,अमर पिंपळेकर,सुरेश बोरकर, मोहन पवार, भनकितसिंग पवार,पवन राजपुत,अमोल पवार,मोहित पवार,मोहनसिंग सिसोदिया,दिपक पवार,ईश्वरसिंग राणा,शरद बोराडे, शैलेश पवार,प्रविण सुरडकर,देवराजसिंह राजपुत,सचिन विलाससिंग इंगळे यांच्यासह आदींनी महाराणाजींच्या जयंतीनिमित्त स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.
रक्तदात्यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते भगवा दुपटट्ा घालुन,गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला व लाडु भरवुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. महाराणाजींच्या जयंतीदिनी रक्तदान केल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करुन सर्व उपस्थितांना महाराणा प्रतापसिंह जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. रक्तसंकलनासाठी खामगाव सामान्य रुग्णालयाचे डॉ.पेसोडे सर, ब्लड टेक्निशियन राजेश्री पाटील,मेघा मॅडम,राम सर,काळे सिस्टर,अन्सारभाई यांच्यासह आदींचे सहकार्य लाभले.यावेळी रक्तदान श्रेष्ठदान,रक्तदान जिवन दान, हम सब एक है,हिंदुसुर्य महाराणा प्रतासिंह की जय,भारत माता की जय अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाला सकल राजपुत समाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, राजपुत समाज बांधव-भगिणीसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.






