Home विदर्भ बळीराजाचा अंत न बघता शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, माजी आमदार राणा...

बळीराजाचा अंत न बघता शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

Oplus_131072

खामगाव ः- अलनिनोच्या प्रभावाचा ऋतुचक्रावर परिणाम,मागील दिड महिन्यांपासून पावसाचा दिर्घ खंड,जमीनीतील आटलेला ओलावा आणि झपाटयाने खालवत चाललेली पाणी पातळी यामुळे खरीप हंगाम संकटाच्या उंबरठयावर पोहाचला आहे.त्यामुळे यंदाचा खरीप केवळ पिकांचा नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न बनला आहे. सोयाबीन व तुर हे पिक जवळपास 90 टक्के उद्ध्वस्त झाले आहे. म्हणून बळीराजाचा अंत न बघता शासनाने बळीराजाचे समाधान होईल अशी त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडववीस,उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, कृषीमंत्री दत्तामामा भरणे, पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे केली आहे.

बुधवार दि.09 सप्टेंबर 2026 रोजी खामगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन प्रत्यक्ष शेतीची पाहणी केली असता जगाचा पोशिंदा बळीराजा यांनी टाहो फोडुन आपल्या व्यथा मांडल्या.आमचे वार्षिक उत्पन्न पाऊस न आल्यामुळे होणार नाही व आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून शासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. टेंभुर्णा, गवंढाळा,आंबेटाकळी,आसा-दुधा,चिंचपूर,पळशी बु.,हिवरखेड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना सानंदांनी धीर दिला. चिंचपूर गावाच्या परिसरातील शेतीकरीता पाण्याची दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे तेथील कोरडवाहु शेतकरी अत्यंत चिंतातूर झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना धीर देवुन आई जगदंबा व सेवालाल महाराज यांच्या मंदिरात बळीराजाच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला शासनाने द्यावा व बळीराजाला परत समृध्द करण्यासाठी शासनाने तात्काळ मदत करावी अशी सामुहिक प्रार्थना करुन देवाला साकडे घालण्यात आले व याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार,कृषीमंत्री दत्तामामा भरणे,पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे आपल्या मतदार संघाची सत्यपरिस्थिती मांडुन दुष्काळग्रस्त शेतकरी यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असे सांगुन त्याप्रसंगी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करुन पाण्याचा व चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यासाठी शासनाच्या वतीने ठोस पाऊले उचलली जातील व तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाईल अशी ग्वाही दिली.

शेतकरी बांधवांच्या बांधाच्या पाहणी दौऱ्यात खामगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज वानखडे, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे,कृ.उ.बा.स.चे संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील, सर्कल प्रमुख गणेश पाटील, अनंता माळी,कडुबा पांढरे, गजानन जाधव, अमोल पाटील,अनिल भाईजी, श्याम मोरे व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह गावातील शेतकरी महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!