श्रीकांत पाचकवडे
अकोला : देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र स्वीकारून जनहिताच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. भाजप सरकारच्या केंद्र व राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची शहरासह ग्रामीण भागात जनजागृती करून जनतेला न्याय मिळवून देत स्थानिक पातळीवर मजबूत संघटन तयार करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवा असे आव्हान महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रतोद आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्ष महानगर आणि जिल्हा ग्रामीण यांची संयुक्त जिल्हा कार्यकारिणी बैठक आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीला प्रामुख्याने मुख्य प्रतोद आ. रणधीरभाऊ सावरकर, खा. अनुपभाऊ धोत्रे, जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ शिवरकर, महानगर अध्यक्ष जयंतभाऊ मसने, महानगर सभापती विजयभाऊ अग्रवाल, माजी आ. बळीरामभाऊ सिरस्कार, महापौर सौ. शारदाताई खेडकर, संजय गोटफोडे, माधव मानकर, अंबादास उमाळे, राजेश नागमते, अॅड. देवाशिष काकड, विद्याधर काकड, अॅड. सौ. रुपालीताई काकडे, सौ. आम्रपालीताई उपर्वट, महिला जिल्हाध्यक्ष सौ. जयश्रीताई पुंडकर, सौ. वैशालीताई शेळके, अकोट नगराध्यक्षा सौ. मायाताई धुळे, मुर्तिजापूर नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे, हिवरखेड नगराध्यक्षा सौ. सुलभाताई दुतोंडे, तेल्हारा नगराध्यक्षा सौ. वैशालीताई पालीवाल.

बैठकीच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे दिवंगत कार्यकर्ते व हितचिंतक यांना श्रद्धांजली वाहून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सुशासन पूर्ती निमित्त त्यांच्या राजकीय व प्रशासकीय अनुभवाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या उमेश पवार, परिमल कांबळे, श्रावण इंगळे, जयश्री कुंडकर यांचा सत्कार करण्यात आला.
आ. रणधीर सावरकर म्हणाले , “मोदीजींच्या २५ वर्षांच्या सुशासनाचा अनुभव जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आम्ही आग्रही असून ग्रामीण भागाचा अहवाल प्रदेशकडे पाठवणार आहोत. आगामी निवडणुकांसाठी बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करा आणि सोशल मीडियावरील अपप्रचाराला तथ्यानिशी उत्तर द्या.”
यावेळी खा. अनुप धोत्रे यांनी SIR नवीन मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर व जयंत मसने यांनी केले, सूत्रसंचालन अंबादास उमाळे यांनी केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा झेंडा फडकवा
आमदार रणधीर सावरकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याच्या सूचना
श्रीकांत पाचकवडे
अकोला : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनहिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची शहरासह ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती करून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. स्थानिक पातळीवर संघटन अधिक मजबूत करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पक्ष महानगर व जिल्हा ग्रामीणची संयुक्त जिल्हा कार्यकारिणी बैठक भाजप कार्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला मुख्य प्रतोद आ. रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ शिवरकर, महानगर अध्यक्ष जयंतभाऊ मसने, महानगर सभापती विजयभाऊ अग्रवाल, माजी आमदार बळीरामभाऊ सिरस्कार, महापौर शारदाताई खेडकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी भाजपचे दिवंगत कार्यकर्ते व हितचिंतक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीतील प्रमुख निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सुशासनाचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा.
शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचे अभिनंदन करणारा ठराव.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीवर सविस्तर चर्चा.
प्रदेश कार्यकारिणीवर निवड झालेल्या उमेश पवार, परिमल कांबळे, श्रावण इंगळे आणि जयश्री कुंडकर यांचा सत्कार.
बूथ पातळीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन
आ. रणधीर सावरकर म्हणाले, “मोदीजींच्या २५ वर्षांच्या सुशासनाचा अनुभव जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहोत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. ग्रामीण भागातील परिस्थितीचा अहवाल प्रदेशाकडे पाठविला जाईल.”
आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक बूथपर्यंत संघटन मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या अपप्रचाराला तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

खासदार अनुप धोत्रे यांनी SIR नवीन मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर व जयंत मसने यांनी केले, तर सूत्रसंचालन अंबादास उमाळे यांनी केले.






