Home Breaking News लॉन टेनिसमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

लॉन टेनिसमध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

Oplus_131072

 

समीक्षा सरोदे व आदित्य चिमकर यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

 

खामगाव : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि तालुका क्रीडा समिती, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ८ सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

खामगाव (OTT News Network ):खामगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकत चालली असून अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी समीक्षा सुरेश सरोदे हिने लॉन टेनिसच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच, याच संस्थेच्या बारावीतील विद्यार्थी आदित्य विजय चिमकर याने जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर, सचिव सुरेखा गुंजकर तसेच शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी भर पडली आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे

Don`t copy text!