Home विदर्भ भाजपा कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद; ज्येष्ठांचा सन्मान, ४५ मंडळांना भेटी

भाजपा कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद; ज्येष्ठांचा सन्मान, ४५ मंडळांना भेटी

गणेशोत्सव सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक — आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे

श्रीकांत पाचकवडे

अकोला : भारतीय जनता पार्टीच्या अकोला कार्यालयात गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. तेजराव थोरात व नाना कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या या परंपरेला आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेले जात आहे.

 

गणेशोत्सवानिमित्त भाजपा कार्यालयात महाप्रसाद व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भजन मंडळी, ह.भ.प. विठ्ठल महाराज खापरकर, गुरुदेव मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

 

पक्षासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा गौरव

 

भाजपाच्या सुरुवातीच्या संघर्षमय काळात कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षविस्तारासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले व दीर्घकाळ सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळलेले पंडितराव कुलकर्णी, भाजपाचे पहिले शहराध्यक्ष अॅड. विजयराव देशमुख, गेल्या २५ वर्षांपासून कार्यालय मंत्री म्हणून कार्यरत असलेले नाना कुलकर्णी, तसेच बाजीराव वजे यांचा सत्कार करण्यात आला.

 

खासदार अनुप धोत्रे यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर होते.

 

‘गणेशोत्सव हा लोकउत्सव’ — अनुप धोत्रे

 

खासदार अनुप धोत्रे म्हणाले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे. या माध्यमातून कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाला लोकउत्सव म्हणून प्रोत्साहन देत पर्यावरण आणि भक्तांच्या भावनांमध्ये समतोल साधण्याची भूमिका घेतली.”

 

उमरी परिसरातील कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचाही त्यांनी उल्लेख केला.

 

आमदार रणधीर सावरकर म्हणाले, “गणपती हा बुद्धी, सिद्धी आणि विघ्नहर्ता मानला जातो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजनाने करण्याची आपली परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. आज हा उत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक बनला आहे.” त्यांनी अकोलेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

 

४५ हून अधिक गणेश मंडळांना भेटी

 

गणेशोत्सवाच्या काळात आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला महानगरासह पंचक्रोशीतील ४५ हून अधिक गणेश मंडळांना भेटी देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. मंडळांच्या माध्यमातून आयोजित वृक्षारोपण, रोगनिदान शिबिरे, चित्रकला स्पर्धा यांसह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत स्पर्धक व आयोजकांचा गौरव करण्यात आला.

 

यावेळी संतोष शिवरकर, जयंत मसने, विजय अग्रवाल, सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, वैशाली शेळके, शारदा खेडकर, सोनाली अंधारे, पल्लवी मोरे, संदीप गावंडे, किशोर वरोकार, किशोर मांगटे पाटील, शिवलाल इंगळे, संतोष बाभुळकर, रमेश गावंडे, माधव मानकर, रणजीत खेडकर, पवन महाले, प्रकाश गुगलीया, राजेश बेले, अनिल पाटील गावंडे, संजय गोटफोडे, संजय ध्रुव, संजय खुणे, संजय कोरडे, रूपाली काकडे, राजेश नागमते, विद्याधर काकड, देवाशिष काकड, आम्रपाली उपर्वट, प्रवीण हगवणे, विठ्ठल वाकोडे, नाना कुलकर्णी, श्रीराम मित्तल, विवेक भरणे, राजू पाटील पागृत, भालचंद्र पागृत, नितेश पाली, हेमंत शर्मा, संतोष पांडे, वैभव माहोरे, नारायण बोर्डे, अंकुश इंगळे, कल्पना पळसपगार, हर्षद भामरे, प्रशांत अवचार, डॉ. अमित कावरे आदी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

Don`t copy text!