Home विदर्भ अकोला जिल्हा रुग्णालयातील अमानवीय प्रकारावर बच्चू कडू आक्रमक

अकोला जिल्हा रुग्णालयातील अमानवीय प्रकारावर बच्चू कडू आक्रमक

आमदार बच्चू कडू
आमदार बच्चू कडू
अधिकाऱ्यांना धारेवर धरले; “सुधारणा करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन अटळ”
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : अकोला जिल्हा रुग्णालयातील एका आजारी रुग्णाला त्यांची पत्नी पाठीवर उचलून फिरवावे लागल्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना विदर्भ नेते आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या.
बच्चू कडू यांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे :
रुग्णांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नसल्याचे वास्तव समोर आले.
स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि इतर मूलभूत सुविधांची कमतरता आढळली.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवला.
प्रशासनाकडून अपेक्षित तत्परता आणि संवेदनशीलता दिसून आली नाही.
पाहणीदरम्यान बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत रुग्णालयातील त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. जनतेला सन्मानाने आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“रुग्णांच्या वेदनांशी खेळ करणारी ही व्यवस्था खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ सुधारणा कराव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
रुग्णालयातील परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा जनआक्रोश अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
Don`t copy text!