Home विदर्भ स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त प्रमुख नितीन लेव्हलकर यांचा सत्कार

स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त प्रमुख नितीन लेव्हलकर यांचा सत्कार

स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त प्रमुख नितीन लेव्हलकर यांचा सत्कार
सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या पुढाकाराने अभिनंदन; प्रभावी पोलिसिंगच्या कार्याला शुभेच्छा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने अकोला पोलीस दलात नुकतेच मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अनेक पोलिस निरीक्षक (पीआय) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) यांच्या बदल्या करण्यात आल्या असून शहर व ग्रामीण भागातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच फेरबदलात आपल्या कर्तबगार आणि धाडसी कामगिरीमुळे ओळख निर्माण केलेले पोलिस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
यापूर्वी जुने शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना नितीन लेव्हलकर यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला. विशेषतः जनावरे चोरी करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश, विविध गुन्ह्यांची जलद उकल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या पुढाकाराने पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे, संदीप खंडारे, महेंद्र भोजने, शिलवंत वानखडे, राहुल गवई, आकाश पहुरकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Don`t copy text!