Home सामाजिक जागतिक योग दिनानिमित्त कर्ता हनुमान योगासन मंडळाच्या ५ दिवसीय योग शिबिराचा उत्साहात...

जागतिक योग दिनानिमित्त कर्ता हनुमान योगासन मंडळाच्या ५ दिवसीय योग शिबिराचा उत्साहात समारोप

हनुमान योगासन मंडळ
श्रीकांत पाचकवडे
अकोला : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कर्ता हनुमान योगासन मंडळ, वानखडे नगर, डाबकी रोड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय योग शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक १७ ते २१ जून २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरात शहरातील मोठ्या संख्येने योगप्रेमींनी सहभाग घेत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश आत्मसात केला.
गेल्या १७ वर्षांपासून कर्ता हनुमान योगासन मंडळामार्फत नियमित योगवर्ग चालविले जात असून योग शिक्षक गजानन धरमकर, विलास आगरकर तसेच महिला योग शिक्षिका सौ. नंदा निच्छळ व सौ. आगरकर ताई यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत योग प्रशिक्षण दिले जाते. योगाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य संवर्धनाचा उपक्रम मंडळ सातत्याने राबवत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवून दिल्यानंतर देशभरात योगाबाबत जनजागृती वाढली आहे. त्याच प्रेरणेतून कर्ता हनुमान योगासन मंडळ दरवर्षी विशेष योग शिबिराचे आयोजन करून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करत आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला डॉ. गजानन कर्हे, आयुर्वेदाचार्य राजेश बोंडे, दयाराम मेतकर, डॉ. रुद्रेश कर्हे, समाजसेवक मुना उकर्डे, रवी गोतमारे, माजी नगरसेवक मनोज गायकवाड, शिवसेना अकोला जिल्हा समन्वयक अशोक ओळंबे, शहराध्यक्ष राजेश मिश्रा, युवासेना अध्यक्ष योगेश ढोरे, नॅशनल मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सिसोदिया मॅडम, सचिन कोरडे, माजी नगरसेविका मंगला म्हैसने यांच्यासह शहरातील अनेक योग साधक उपस्थित होते.
यावेळी शिवसेना शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल राजेश मिश्रा यांचा कर्ता हनुमान योगासन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन धरमकर यांनी केले.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमांना यश
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. सुखदेव वाडकर महाराज, विलास आगरकर, गजानन धरमकर, मुरलीधर आवटे, गजानन माळी, भिका भगत, सेलसिंग सिसोदिया, संजय वेध, विठ्ठल चिकटे, दत्ता वेध, हिमतराव पोहरे, भीमराव ठाकरे, शांताराम काळेमेजर, दिवाकर देशमुख, चंद्रकांत ताठे, अश्विन चोपडे, संतोष जाधव, विलास धरस्कर, अशोक भिलकर आणि शरद लोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच शीला माळी, वाहोकार ताई, रजनी ताई पोहरे, पाथरीकर ताई, खाडे ताई, देशमुख ताई, ढोरे ताई, टेकाडे ताई, राऊत ताई, लोटे ताई, भाकरे ताई, भारसाकडे ताई, वानखडे ताई, आगरकर ताई, उजाडे ताई, चोपडे ताई आणि ताले ताई या महिला कार्यकर्त्यांनीही आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
मंडळाच्या वतीने शहरातील सर्व योग साधकांनी समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहून योगाचा लाभ घ्यावा आणि निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
Don`t copy text!