Home सामाजिक आ. रणधीर सावरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणरायाची स्थापना

आ. रणधीर सावरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणरायाची स्थापना

कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

 

 

श्रीकांत पाचकवडे

अकोला : गणरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात भाजप नेते तथा विधिमंडळ मुख्य प्रतोद आ. रणधीर सावरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. या सोहळ्याला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

 

गणेशपूजनाने शुभकार्याची सुरुवात करण्याची परंपरा आहे. बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून गणरायाची आराधना केली जाते. त्याच श्रद्धेने कार्यालयात गणरायाची स्थापना करून पूजा-अर्चा व आरती करण्यात आली.

 

यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा आणि बंधुभाव वाढविणारा उत्सव असल्याचे सांगितले. गणरायाच्या आगमनामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

 

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

 

स्थापना सोहळ्यास जयंत मसने, किशोर मांगटे पाटील, नाना कुलकर्णी, संजय ध्रुव, संजय खुणे, रितेश जपणारे, गोटफोडे, शिवलाल इंगळे, संजय कोरडे, मनीष गावंडे, विवेक भरणे, राजू पाटील पागृत, भालचंद्र पागृत, नितेश पाली, हेमंत शर्मा, संतोष पांडे, वैभव माहोरे, नारायण बोर्डे, अंकुश इंगळे, कल्पना पळसपगार, प्रकाश श्रीमाळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

गणेशोत्सवातून सामाजिक एकतेचा संदेश

 

गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेची मोठी परंपरा लाभली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप देत समाजजागृती आणि लोकसंघटनाला चालना दिली. त्यामुळे आजही गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

 

जनसंपर्क कार्यालयात गणेशोत्सवाच्या कालावधीत दररोज पूजा, आरती आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माधव मानकर यांनी दिली.

Don`t copy text!