२५ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा कायम; दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : गणेशोत्सवानिमित्त माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे आणि विधिमंडळ मुख्य प्रतोद आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या स्वागतासाठी कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

संजयभाऊ धोत्रे यांच्या निवासस्थानी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. यावेळी शाडू मातीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. संजयभाऊ धोत्रे, सुवासिनीताई धोत्रे, खासदार अनुप धोत्रे, समीक्षाताई धोत्रे, रणविजय, यशिका, राजनंदिनी धोत्रे यांच्यासह मोहन पारधी आणि प्रदीप नंदापुरे उपस्थित होते.
सावरकर निवासस्थानीही भक्तिमय वातावरण
आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या निवासस्थानी प्रल्हादराव सावरकर, मंजुषाताई सावरकर, सायली सावरकर आणि हर्ष सावरकर यांच्या उपस्थितीत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
तसेच सावरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातही गणरायाची पूजा करण्यात आली. यावेळी गजानन मानखैर, श्रीराम देशमुख, गजानन टाले, संतोष काटे, गजानन गावंडे, राजेश बेले, वैभव माहोरे आणि विवेक भरणे उपस्थित होते.
दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत बाप्पाचे उत्साहात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.






