Home सामाजिक हिंगणा कुपटा येथे ‘अशोका फाउंडेशन’च्या पहिल्या शाखेची उत्साहात स्थापना

हिंगणा कुपटा येथे ‘अशोका फाउंडेशन’च्या पहिल्या शाखेची उत्साहात स्थापना

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : अशोका फाउंडेशन बाळापूर, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हिंगणा कुपटा गट ग्रामपंचायत येथे संघटनेची पहिली अधिकृत शाखा अत्यंत उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके हे होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली या पहिल्या शाखेच्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

अशोका फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे, गरजू वंचितांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग वाढवणे या उद्देशाने ही शाखा सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे ध्येय-धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.

 

हिंगणा कुपटा शाखेची नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

 

* शाखा अध्यक्ष: विजय सु. सावदेकर

* उपाध्यक्ष: उमेश गायकवाड

* सचिव: कुणाल खरात

* महासचिव: संजय गायकवाड

* कोषाध्यक्ष: रोहित खंडारे

* संघटक: अक्षय सावदेकर

* प्रसिद्धीप्रमुख: पप्पू गायकवाड

* युवा प्रमुख: प्रणव पातोडे

* शाखा सदस्य: कुणाल पातोडे, अभय खंडारे

 

या नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल अकोला आणि बाळापूर परिसरातील अनेक मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. समाजहितासाठी ही नूतन टीम सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Don`t copy text!