Home Breaking News ‘फोटोसेशन नको, तुमचे दौरे रद्द करा..!’ : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष खोडके...

‘फोटोसेशन नको, तुमचे दौरे रद्द करा..!’ : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष खोडके आक्रमक

 

 

दुष्काळी पंचनाम्यांवरून महसूल मंत्र्यांसमोर थेट इशारा ; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी

 

‘शंभर टक्के नुकसान असताना तर पंचनाम्यातही शंभर टक्केच नुकसान दाखवा’; चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा

 

 

 

श्रीकांत पाचकवडे 

अकोला : अकोला जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि प्रत्यक्ष मदतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंचनाम्यांच्या नावाखाली ‘फोटोसेशन’ नको, तर प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करा, अशी आक्रमक मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी महसूल मंत्री यांच्याकडे थेट बोलताना केली.

 

या मागणीसाठी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी अकोला येथील शासकीय विश्रामगृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना खोडके चांगलेच आक्रमक झाले.

 

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. महसूल मंत्री बावनकुळे यांनीही अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावर भर दिला आहे….

 

मात्र, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांची जमिनीवरील अंमलबजावणी यामध्ये तफावत असल्याचा दावा खोडके यांनी निवेदनातून केला आहे….

 

‘दुष्काळ जाहीर झाला, मग पंचनाम्यांच्या नावाखाली फोटोसेशन कशासाठी?’

 

अकोला जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्याची नजरअंदाज खरीप पैसेवारी ४४ पैशांवर आल्याचे अलीकडील वृत्त आहे….

 

या पार्श्वभूमीवर खोडके यांनी महसूल विभागाच्या पंचनामा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले..

 

‘शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान पाहण्यासाठी अधिकारी बांधावर गेले पाहिजेत. केवळ फोटो काढून किंवा कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.. गावत चौकात बसुन,सही घेत आहे..दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीची खरी नोंद झाली पाहिजे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

काही ठिकाणी अधिकारी प्रत्यक्ष शेतात न जाता गावातच शेतकऱ्यांना बोलावून घेत असल्याच्या आणि कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्याच्या आरोप संघटनेने केला आहे…शेतकऱ्यांकडून समोर येत असल्याचा दावा खोडके यांनी केला आहे….

 

 

तातडीने चौकशी करून पडताळणी करून ज्या ठिकाणी त्रुटी असतील त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी खोडके यांनी केल.

 

‘शंभर टक्के नुकसान असेल तर ४०-६०-७०-८० टक्के कसे?’

 

पंचनाम्यात नोंदवल्या जाणाऱ्या नुकसानीच्या टक्केवारीवरही खोडके यांनी तीव्र आक्षेप घेतला.

 

‘शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान शंभर टक्के असेल, तर पंचनाम्यातही वस्तुस्थितीनुसार शंभर टक्केच नुकसान दाखवले पाहिजे. ४०, ६०, ७० किंवा ८० टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्याच्या हक्काची मदत कमी होता कामा नये,’ अशी मागणी त्यांनी केली.

 

नुकसानाची नोंद चुकीची झाल्यास संबंधित शेतकऱ्याला पुनर्पंचनाम्याची संधी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

 

‘एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्याविना राहता कामा नये!’

 

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, पंचनाम्यातील नोंद संबंधित शेतकऱ्याला दाखवावी आणि त्यानंतरच स्वाक्षरी घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली…. मात्र असे होत असल्याचे सद्या ते म्हणाले..

 

पंचनाम्यांमध्ये अनियमितता असून संबंधित तलाठी, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबित कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

 

 

 

‘दौरे रद्द करा; आधी शेतकऱ्यांना मदत द्या!’

 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि प्रशासकीय दौऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगत खोडके यांनी ‘दौरे रद्द करा आणि शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या,’ अशी मागणी केली….

 

शेतकऱ्याला आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

हेक्टरी एक लाख रुपये मदतीची प्रमुख मागणी

 

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे.

 

यासोबतच—

 

– नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी ₹२ लाखांचे विशेष अनुदान द्यावे.

– २०२४, २०२५ आणि २०२६ या तीन वर्षांचा प्रलंबित पीक विमा तात्काळ जमा करावा.

– कर्ज थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा CIBIL स्कोअर खराब होऊ नये, यासाठी स्पष्ट आदेश द्यावेत.

– पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देताना अडथळे आणू नयेत.

– २०१९ पूर्वीचे प्रलंबित कर्ज माफ करावे.

– शेतमजूर व भूमिहीनांना ₹२५ हजारांचे विशेष पॅकेज द्यावे.

– दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

– वीजबिल, बँक आणि मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.

– दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी.

– महिला बचत गटांचे कर्ज माफ करावे.

 

या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

‘शेतकऱ्याला आश्वासन नको, खात्यावर प्रत्यक्ष मदत हवी!’

 

‘शेतकऱ्याला आश्वासन नको; त्याच्या खात्यावर प्रत्यक्ष मदत हवी. शंभर टक्के नुकसान असेल तर पंचनाम्यातही शंभर टक्केच नुकसान नोंदले गेले पाहिजे. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये,’ असा स्पष्ट इशारा पूर्णाजी खोडके यांनी दिला…..

 

 

‘क्रांतिकारी एल्गार’चा इशारा

 

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘क्रांतिकारी एल्गार’ व मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही…असा इशारा , खोडके यांनी दिला.आहे……

 

‘फोटोसेशन नको—शेतकऱ्यांच्या बांधावर थेट 100 टक्के पंचनामे करा…!

 

कागदावरील घोषणा नकोत—शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष मदत जमा करा!

शंभर टक्के नुकसान आहे.. तर पंचनाम्यातही शंभर टक्केच नुकसान दाखवा!

 

 

 

दौरे नकोत—शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाखांची मदत द्या!’

 

या मागण्यांमुळे अकोला जिल्ह्यातील दुष्काळी पंचनामे, नुकसानीची अचूक नोंद आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Don`t copy text!