Home Health कुही तालुक्यातील वेलतूर येथील विद्यार्थिनीचा डेंगूने  उपचारादरम्यान मृत्यू ; डेंगूने डोके काढले...

कुही तालुक्यातील वेलतूर येथील विद्यार्थिनीचा डेंगूने  उपचारादरम्यान मृत्यू ; डेंगूने डोके काढले वर

कुही तालुक्यातील वेलतूर येथील विद्यार्थिनीचा डेंगूने  उपचारादरम्यान मृत्यू ; डेंगूने डोके काढले वर

कुही:-  तालुक्यातील मौजा- वेलतूर येथील तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा डेंगूमुळे  उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

 

चेतना चाचेरकर (वय-१३) रा. वेलतूर  असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती वेलतूर येथेच इयत्ता  आठव्या वर्गात शिकत होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ती  मांढळ येथे उपचार घेत असून काल शुक्रवारी तिला नागपूर येथे रेफर केल्यावर तिच्यावर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ  उडाली असून आरोग्य यंत्रणेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात डेंगूणे डोके वर काढले असून पचखेडी येथील एका विद्यार्थिनीवर डेंगू चा उपचार सुरू आहे. तर  या व्यतिरिक्त आणखी 3 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

Don`t copy text!