प्रशांत पाटील
नांदुरा: नगर परिषदेचे नगरसेवक मोहम्मद फुरकान मोहम्मद इरफान मेमन यांना Iconic Peace Award Council तर्फे सोशल वर्क आणि पॉलिटिक्स क्षेत्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, Iconic Peace Award Council ही सामाजिक कार्य, नेतृत्व आणि जनकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणारी Central Government-affiliated संस्था आहे.
सामाजिक सेवा, जनहिताची कामे आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मोहम्मद फुरकान मोहम्मद इरफान मेमन यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल बोलताना मोहम्मद फुरकान यांनी आनंद व्यक्त करत हा क्षण आपल्या जीवनातील अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगितले. समाजसेवा, युवकांचे सक्षमीकरण आणि नागरिकांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा या सन्मानामुळे मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी हा सन्मान नांदुरा येथील नागरिक, समर्थक, शुभेच्छुक आणि आपल्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना समर्पित केला.
मोहम्मद फुरकान यांना मिळालेला हा बहुमान नांदुरा शहरासह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.






