Home विदर्भ OTT न्यूजच्या विदर्भ कार्यकारी संपादकपदी ख्यातनाम पत्रकार श्रीकांत पाचकवडे यांची नियुक्ती

OTT न्यूजच्या विदर्भ कार्यकारी संपादकपदी ख्यातनाम पत्रकार श्रीकांत पाचकवडे यांची नियुक्ती

akola news

अकोला, : पत्रकारिता क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले ख्यातनाम पत्रकार श्रीकांत पाचकवडे यांची ओटीटी न्यूजच्या विदर्भ कार्यकारी संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

श्रीकांत पाचकवडे यांनी 2004 पासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. अकोला, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी सीनियर रिपोर्टर तसेच पॉलिटिकल हेड म्हणून विविध वृत्तसंस्थांमध्ये जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण, तळागाळातील प्रश्नांवर प्रभावी रिपोर्टिंग आणि अभ्यासपूर्ण बातमी मांडणी ही त्यांची खास ओळख राहिली आहे.

पत्रकारितेतील त्यांच्या प्रवासात त्यांनी सरकारनामा या प्रतिष्ठित माध्यमात कार्य करत डिजिटल पत्रकारितेचा व्यापक अनुभव घेतला. त्यानंतर देशोन्नतीमध्ये ऑनलाइन एडिटर तसेच तब्बल 16 आवृत्त्यांचे संपादक म्हणून काम करत संपादकीय नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

पुढे दैनिक अजिंक्य भारतच्या अकोला आवृत्तीचे पॉलिटिकल हेड म्हणून कार्यरत राहून त्यांनी स्थानिक राजकारण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. सध्या ते दैनिक मातृभूमीमध्ये संपादक म्हणून कार्यरत असून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर सातत्याने प्रभावी लेखन आणि मार्गदर्शन करत आहेत.

20 वर्षांहून अधिक काळाच्या पत्रकारितेच्या प्रवासात श्रीकांत पाचकवडे यांनी निष्पक्ष, निर्भीड आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेची परंपरा जपली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ओटीटी न्यूजच्या विदर्भ विभागातील वृत्तांकन, विश्लेषण आणि संपादकीय गुणवत्ता अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Don`t copy text!