Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक पाऊलखुणांना शिवसेना विशेष जिल्हा प्रभारी ललित वानखडेंची मानवंदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक पाऊलखुणांना शिवसेना विशेष जिल्हा प्रभारी ललित वानखडेंची मानवंदना

पातूरडा गावाला विशेष भेट; ऐतिहासिक स्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी साधला संवाद

श्रीकांत पाचकवडे

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृती जपणाऱ्या पातूरडा गावाला शिवसेनेचे अकोला जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखडे यांनी भेट देत ऐतिहासिक स्थळाला अभिवादन केले. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पातूरडा गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी गावातील विहिरीचे पाणी प्राशन केले तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते, अशी स्थानिक पातळीवर सांगितली जाणारी ऐतिहासिक आठवण आहे. त्यामुळे या गावाला सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

या ऐतिहासिक स्मृतीस्थळाला भेट देताना ललित वानखडे यांनी बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन केले. महापुरुषांच्या पाऊलखुणा आणि ऐतिहासिक वारसा जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

भेटीदरम्यान वानखडे यांनी पातूरडा येथील ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. गावातील विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

 

यावेळी किरण शिरसाठ, धीरज इंगळे, शुभम वानखडे, बंटी तिडके यांच्यासह पातूरडा येथील ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.

Don`t copy text!