Home सामाजिक पळसोद येथे आज मारोती महाराज संस्थानचा यात्रा महोत्सव

पळसोद येथे आज मारोती महाराज संस्थानचा यात्रा महोत्सव

पळसोद येथे आज मारोती महाराज संस्थानचा यात्रा महोत्सव

 

भव्य मिरवणूक, गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

 

कुशल भगत

अकोट : अकोट तालुक्यातील पळसोद येथे ग्रामदैवत श्री मारोती महाराज संस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज, बुधवार, २३ सप्टेंबर रोजी महाप्रसाद, तर उद्या, गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी भव्य मिरवणूक, गोपालकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

पळसोद

ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मारोती महाराजांच्या हरिनाम सप्ताहाची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी तीर्थस्थापनेने झाली. सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पंचक्रोशीतील भाविक व भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थान व्यवस्थापनाने केले आहे.

 

भव्य मिरवणुकीत विविध कलाप्रकारांचे सादरीकरण

उद्या सकाळी ९ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पंचक्रोशीतील भजनी मंडळांसह लळीत, भजन, पोवाडे, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि विविध सांस्कृतिक कलाप्रकार सादर करण्यात येणार आहेत.

 

कार्यक्रमाचे वेळापत्रक

२३ सप्टेंबर : दुपारी ४ वाजता महाप्रसाद.

 

२४ सप्टेंबर : सकाळी ९ वाजता भव्य मिरवणूक.

 

गोपालकाला : दुपारी १२ वाजता.

 

महाप्रसाद : सायंकाळी ६ वाजल्यापासून.

 

भजनी मंडळांसाठी मानधनाची व्यवस्था

मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भजनी मंडळांनी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत वाद्यांसह मंदिर व्यवस्थापकांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

१० किलोमीटरच्या आतील भजनी मंडळांना १,५०१ रुपये.

 

१० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील मंडळांना २,००१ रुपये.

 

डफडे वाजविणाऱ्यांना २०१ रुपये मानधन.

 

मानधनाचे वितरण दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.

 

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा महोत्सव, मिरवणूक व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मारोती महाराज संस्थान व्यवस्थापन, ग्रामस्थ व भाविक मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्थळ : पळसोद, ता. अकोट, जि. अकोला.

Don`t copy text!