Home महाराष्ट्र आमदार नितीन देशमुखांच्या खांद्यावर तीन लोकसभा मतदारसंघांची धुरा! अकोला, अमरावती, बुलढाण्यात शिवसेना...

आमदार नितीन देशमुखांच्या खांद्यावर तीन लोकसभा मतदारसंघांची धुरा! अकोला, अमरावती, बुलढाण्यात शिवसेना संघटना मजबूत करण्याची जबाबदारी

आमदार नितीन देशमुख
आमदार नितीन देशमुख
श्रीकांत पाचकवडे 
अकोला : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) ‘मातोश्री’वर घेतलेल्या बैठकीत प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांवर विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली.
यामध्ये पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशमुख यांची या मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अकोला, अमरावती आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आता नितीन देशमुख यांच्या खांद्यावर आली आहे. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्ष संघटनेत समन्वय साधत आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
बैठकीला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासह अमरावती, बुलढाणा आणि राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‘येणारा काळ आपलाच!’
सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटना मजबूत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ‘येणारा काळ आपलाच आहे,’ असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे संकेत दिले. राज्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, असे आवाहनही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
Don`t copy text!